Pune

मिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू

वडगावजवळील नवले ब्रिजखालील एका मिठाईच्या दुकानात घुसला. या भीषण अपघातामध्ये एक संगणक अभियंता महिला ट्रकमध्ये अडकून जागीच ठार

accident

पुणे – वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळ भरधाव रेडिमिक्स सिमेंटचा टॅंकर मिठाईच्या दुकानात घुसल्याने एका सॉफ्टवेयर इंजिनियर तरूणीचा मृत्यू झाला वडगावजवळील नवले ब्रिजखालील एका मिठाईच्या दुकानात घुसला. या भीषण अपघातामध्ये एक संगणक अभियंता महिला ट्रकमध्ये अडकून जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कात्रजमधील लुंकड ट्रान्सपोर्टचा रेडिमिक्स सिमेंट टॅंक येत होता. भरधाव येणा-या टॅंकरचालकाला वेग आटोक्यात राखला आला नाही. त्यामुळे पुलाखाली टॅंकर येताच तो तेथील विश्व आर्केड इमारतीमध्ये घुसला. तेथील सिरवी मिठाईवाले दुकानासमोरच फास्टफुड आणि उसाच्या रसाचा स्टॉल आहे. या स्टॉलवर आयटी कंपनीतील कर्मचारी उसाचा रस पिण्यासाठी आले होते. त्यावेळी टॅंकर आवारात घुसत असल्याचे लक्षात येताच ते पळू लागले. मात्र, यात स्वातीचा पाय घसरल्यामुळे ती पाय-यावर पडली. त्याचवेळी ती टॅंकरच्या चाकाखाली आली. स्वातीचा त्यात जागीच मृत्यू झाला. टॅंकरखालून स्वातीचा मृतदेह काढण्यासाठी अग्निशमन दलाला बरीच धडपड करावी लागली.

या अपघातात संदीप संतोष पाटील (वय-30, वाल्हेकर कॉलनी, न-हे) आणि सुनील बाबासाहेब साळुंखे (वय 40, रा. भूमकरनगर, न-हे) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात टॅंकर चालकाविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: