Mumbai

अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळ तुटल्यानं मोठा अपघात टळला .

रेल्वे रुळावरुन ट्रेनचे तीन डबे गेले, तरीही सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

central-railway-ambarnath-

बदलापूर ते अंबरनाथ स्थानकादरम्यान आज सकाळीच रेल्वे रुळाला तडा गेला. यामुळे सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या काही काळ बदलापूर स्थानकावर खोळंबल्या. यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ठप्प झाली होती. कामावर जाण्याच्या वेळीच हा प्रकार घडल्यामुळं प्रवाशांची अक्षरश: तारांबळ उडाली होती. ऐन कामाच्या वेळी हा खोळंबा झाल्याने बदलापूर ते कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर प्रवाशांसाठी पालिकेने जादा बसेसची कोणतीही व्यवस्था न केल्याने प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. दरम्यान तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे.

आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान बदलापूर ते अंबरनाथ स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे अप आणि डाऊनमार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी कामावर जायची घाई असतानाच रुळाला तडे गेल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत होऊन चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. रेल्वे रुळाला तडा गेल्याचं कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचं काम सुरू केलं. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत विक्रमी वेळेत ही दुरुस्ती करून नोकरदार वर्गाला दिलासा दिला. त्यामुळे नोकरदारांची आजच्या दिवसाची धावपळ वाचली.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: