Mumbai

हार्बर रेल्वे मार्गावरवरील आणखी दोन दिवस विशेष ब्लॉक .

हार्बर मार्गावर बेलापूर स्थानकात २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

harbar train

हार्बर मार्गावरील बेलापूरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी २७ ते २९ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय. त्यामुळे अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मंगळवारी हार्बर मार्गावर बेलापूर स्टेशनवर पेंटाग्राफ तुटल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे बेलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ च्या वायर नादुरुस्त झाल्या  होत्या.फलाट क्रमांक एकचं काम करुन वाहतूक पूर्व पदावर केली होती. आज फलटा क्रमांक दोनचं काम हाती घेण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावरील बेलापूरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी मंगळवार मध्यरात्री ते २९ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय. त्यामुळे हार्बर मार्गावर चालणा-या ६०४  फे-यांपैकी ३४ फेऱ्या रद्द केल्यात. यामुळे मागील आठवड्याप्रमाणेच प्रवाशांना इच्छित स्थळ गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: