National

सचिन तेंडुलकरचे राज्यसभेतील पहिले भाषण थांबले बोलूच दिलं नाही .

खासदार सचिन तेंडुलकर आज राज्यसभेत उपस्थित होता. ‘राईट टू प्ले’ या विषयावर सचिन आपलं आज मत मांडणार होता, मात्र विरोधकांच्या गदारोळात सचिनला बोलण्याची संधी मिळाली नाही.

sachin

नवी दिल्ली : खासदार सचिन तेंडुलकर आज राज्यसभेत उपस्थित होता. ‘राईट टू प्ले’ या विषयावर सचिन आपलं आज मत मांडणार होता, मात्र विरोधकांच्या गदारोळात सचिनला बोलण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे खासदार झाल्यापासून सचिन पहिल्यांदाच राज्यसभेत बोलणार होता.

सचिन सभागृहात राइट टू प्ले आणि भारतातील खेळाचे भवितव्य या विषयावर बोलणार होता. त्यासाठी त्याला काँग्रेसचे सदस्य पीएल पुनिया आणि भाजपचे रणविजय सिंह जूदेव यांचा पाठिंबाही मिळाला. पण गोंधळामुळे त्यांचे भाष सुरुच होऊ शकले नाही. व्यंकय्या नायडू यांनी सचिनचे भाषण सुरू व्हावे म्हणून आधी मेंबर्सना शांत राहण्याचे अपिल केले. पण सदस्य गोंधळ घालत राहिले.

संसदेत दिलेल्या नोटिसनुसार सचिन तेंडुलकरला राइट टू प्ले या विषयावर चर्चा करायची होती. शिक्षणाबरोबरच खेळही अनिवार्य करायला हवा असे सचिनचे मत आहे. तसेच खेळासाठी आवश्यत सोयीसुविधाही सर्व मुलांसाठी उपलब्ध असाव्यात असेही सचिनला वाटते. तसा घटनात्मक अधिकार असावा अशी सचिनची इच्छा आहे.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनीही मुलांना स्पोर्ट्स आणि फिजिकल अॅक्टीव्हिटीजमध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती. भारतीय मुलांच्या लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येमुळे मोदी चिंतीत होते. त्यामुळेच त्यांनी ही विनंती केली होती.

सचिन तेंडुलकरने नुकतीच महाराष्ट्रातील उस्मानाबादमधील डोंजा गावाला भेट दिली आहे. खासदार आदर्श ग्राम योजनेत गावाचा विकास करण्यासाठी सचिनने हे गाव दत्तक घेतले आहे. सचिनने गावाला चार कोटींचा निधी दिला आहे. सचिन मंगळवारी येथे पोहोचला होता.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: