Business

RBI 2000 रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे .

रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी चलनात आणलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे .

2000-currency

रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी चलनात आणलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे किंवा थांबवणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. इतकेच नाही तर रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांचा नोटा चलणात आणणे सुद्धा बंद केले आहे, असा अंदाज देशातील सार्वजनिक क्षेत्रात असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाकडून करण्यात आलेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने गेल्या काही दिवसांत लोकसभेत सादर केलेल्या वार्षिक रिपोर्टच्या आधारे एसबीआय इकोफ्लॅशने आपला अहवाल मांडला आहे. यामध्ये रिझर्व्ह बँकेने 8 डिसेंबर 2017 पर्यंत 15,78,700 कोटी रुपये मुल्य असलेल्या मोठ्या नोटांची छपाई केली आहे. यात 2,46,300 कोटी रुपये मुल्यच्या नोटा रिझर्व्ह बँकेने अद्याप व्यवहारात आणलेल्या नाहीत. यामुळे रिझर्व्ह बँक दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबवू शकते. तसेच 2,463 अब्ज रुपये मुल्यच्या दोन हजार रुपयाच्या नोटा जारी करण्याऐवजी 50 आणि 200 रुपयाच्या छोट्या चलनी नोटा आरबीआयकडून जारी होण्याची शक्यता आहे, असे एसबीआय समूहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
याचबरोबर अहवालानुसार, दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे बाजारात व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. सुट्ट्या पैशांचा प्रश्न गंभीर होत चालल्याने हळूहळू दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने कमी केली आहे किंवा त्या परत घेण्याच्या तयारीत आहे. तसेच सरकार आणि आरबीआय आर्थिक व्यवहारात 35 टक्के भाग हा छोट्या चलनी नोटाचा ठेवण्याच्या विचारात आहे, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: