MaharashtraNational

राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेस अध्यक्षपदासाठी.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला आहे.

rahul

नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस मुख्यालयात पार्टी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पार्टीतील दिग्गज नेतेमंडळीदेखील काँग्रेस मुख्यालयात उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, कर्नाटकचे सिद्धारमय्या, हिमाचल प्रदेशचे वीरभद्र सिंह,  वी.नारायणस्वामी, मेघालयचे मुकुल संगमा आणि वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधियादेखील हजर होते. दरम्यान, दुसरा अर्ज दाखल झाला नाही तर, पक्षाचे निवडणूक प्राधिकरण 5 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करू शकेल.

राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरा अर्ज दाखल होण्याची शक्यता जवळपास नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मात्र, ४ डिसेंबर रोजी दुपारनंतरच चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, मंगळवारी  राहुल गांधी गुजरातकडे रवाना होतील. कारण, गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे. प्रचाराची मुदत संपेपर्यंत ते गुुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. ते ५ ते ७ डिसेंबरपर्यंत ते पहिल्या टप्प्यात निवडणुका होणा-या मतदारसंघात सभा, रोड शोद्वारे प्रचार करणार आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: