FaishonEntertainmentMovie

‘ऑस्कर’साठी प्रियांका चोप्राची तयारी

२०१८ च्या आॅस्कर अवार्ड सोहळ्यात प्रियांका खास आकर्षण असणार आहे

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा हिच्या चाहत्यांसाठी एक अभिमानाची बातमी आहे. होय, यंदाच्या म्हणजेच २०१८ च्या आॅस्कर अवार्ड सोहळ्यात प्रियांका खास आकर्षण असणार आहे. या सोहळ्यात प्रियांका प्रतिष्ठित आॅस्कर पुरस्काराची नामांकने जाहिर करताना दिसेल. द अ‍ॅकेडमीच्या अधिकृत अकाऊंटवर प्रियांकाचे ‘बिहाईन्ड द सीन’चे काही फोटो शेअर केले गेले आहेत. या फोटोत प्रियांका एक ‘बिहाईन्ड द सीन’ शूट करताना दिसतेय. या फोटोमध्ये पीसीने ब्लॅक पँट आणि सिल्व्हर टॉप घातलेले आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार, मंगळवारी पहाटे ५ वाजून २२ मिनिटाला ९० व्या आॅस्कर नामांकनाची घोषणा होणार आहे. यावेळी रोजेरिया डॉसन, रिबेल विल्सन आणि मिशेल राड्रिग हे हॉलिवूडचे दिग्गज प्रियांकासोबत असतील.आॅस्कर नामांकनाची घोषणा करण्याचा मान कायम हॉलिवूडच्या ए लिस्टमध्ये सामील कलाकारांना दिला गेला आहे. त्यामुळे यंदा प्रियांकाला हा मान मिळावा, ही तिची मोठी उपलब्धी मानली जात आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: