Mumbai

पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.

cm-devendra-fadanvis-helicopter-accident

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी १ वाजता, भाईंदरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना हा अपघात झाला.

केबलची वायर दिसल्याने अचानक हेलिकॉप्टरचं टेक ऑफ करण्यात आलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टर उतरत असताना हेलिकॉप्टर पायलटला अचानक ती केबल दिसली. पायलटने हेलिकॉप्टर लॅंड होत असताना ते पुन्हा टेकऑफ केलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी ग्राऊंड इंजिनिअरला निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वीही दोन- तीन वेळा मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.

मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस मीरारोड येथे नवीन वरसावे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या आगमनासाठी बुधवारी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या मैदानात हैलिपॅड तयार करण्यात आले होते. हेलिकॉप्टर लँडिंगवेळी तेथील ओव्हरहेड वायरचा अडथळा होऊ नये, यासाठी त्या काढण्यात आल्या होत्या. दुपारी १२,४५ ते १ वाजेदरम्यान मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लँड होतेवेळी दोन इमारतींच्यामध्ये लटकत असलेली केबलची वायर पायलटला दिसली. पायलटला जर वेळीच केबलची तार दिसली नसली तर हेलिकॉप्टर लँड होताना त्याचे पंखे वायरमध्ये अडकून मोठा अपघात घडला असता. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री होते.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: