National

पुन्हा नव्याने चालणार नितीन आगे हत्या प्रकरण .

सर्व साक्षीदारांची फेरसाक्ष घेऊन, नव्याने पुरावे सादर करावेत, फितूर साक्षीदारांविरोधात कारवाई करावी या याचिकेतील मागण्याही खंडपीठाने मान्य केल्या आहेत.

nitin-aage

अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित नितीन आगे हत्येचा खटला पुन्हा अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात चालणार आहे. या आशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठाने मान्य केली आहे.याप्रकरणी दोषींना सगळ्या साक्षीदारांची नव्याने साक्ष नोंदवून, नव्याने पुरावे सादर करावेत असे कोर्टाचे निर्देश आहेत.

त्याचप्रमाणे फितूर साक्षीदारांविरोधात कारवाईचे आदेशही खंडपिठानं दिले आहेत. त्याचप्रमाणे आगे कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी असाही आदेश खंडपिठानं दिलाय. संजय भालेराव आणि प्रदीप भालेकर या दोघांनी आगेच्या हत्येप्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर आज खंडपिठानं हा निर्णय दिला.

साधारण दोन वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा गावात राहणाऱ्या नितीन आगेची हत्या करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांवर आरोपपत्र दाखल करून खटला चालवण्यात आला. पण पुराव्या अभावी तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: