Mumbai

मुंबई-पुणे एक्स्प्रेस प्रचंड वाहतूक कोंडीचा अडथळा , वेवर वाहनांच्या रांगा.

हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.

mumbai traffic

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय.ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळं त्याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक विभागानं ऐरोलीमार्गे ईस्टर्न एकप्रेस हायवेहुन ठाण्याकडे वाहतूक वळवल्यानं ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा ताण पडला. याचा फटका सीएसटीहुन ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना देखील बसलाय. ईस्टर्न एकप्रेस हायवे मुलुंडपासून भांडुपपर्यत तसेच ऐरोली हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय.

नाताळमुळे आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पुण्याकडे येणा-या मार्गिकांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या आहेत. द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महामार्ग पोलीस प्रयत्न करत आहेत. पुण्याकडे येताना घाट क्षेत्रात वाहने बंद पडल्यास तातडीने ती बाजुला करण्याकरिता क्रेन सर्व्हिस उपलब्ध केलेली आहे. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहनांच्या लांबवर रांगा गेल्या आहेत. मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर खंडाळा बाह्य वळण ते खंडाळा बोगदा दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरांकडील एक लेन बंद केल्याने दोन लेनवर वाहतुकीचा ताण येत वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत.

चौथा शनिवार, रविवार आणि ख्रिसमस असे सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक प्रवासी द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच लोणावळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय मार्गावर देखिल वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत.

मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वेवर प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. खंडाळा घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली असून गाड्या शेडुंग फाट्यावरुन वळवण्यात आल्या आहेत. तसंच अवजड वाहनांची वाहतूक जुन्या हायवेवरुन वळवण्यात आली आहे. खालापूर टोलनाक्यावर जवळपास चार किमी लांब रांगा लागल्या आहेत. टोलनाक्यावर गाड्यांची रांग लागली असल्या कारणाने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई – नाशिक हायवेवरील वाहतूकही मंदावली आहे.

फक्त मुंबई -पुणे नाही तर मुंबई – गोवा आणि अहमदाबाद हायवेवरही वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबई – गोवा हायवेवर पेणजवळ प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. कोकणात जाणा-या रस्त्यांवर गाड्यांच्या चार ते पाच किमी लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई – अहमदाबाद हायवेवरही हीच परिस्थिती आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: