Mumbai

मुंबईत धुक्यामुळे मध्य रेल्वे उशिराने.

मुंबईतला गारठा वाढला असून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळत आहे. आज सकाळी ठिकठिकाणी धुक्याचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय. धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेलाही पहायला मिळत आहे.

train

मुंबईवर आज पहाटेपासूनच सर्वत्र धुके पसरून राहिले आहे. परिणामी कमी दृश्यमानतेमुळे पहाटे उपनगरी रेल्वेचं वेळापत्रक पूर्ण कोलमडलं होतं. मध्य रेल्वेच्या वासिंद स्थानकावर मुंबईकडे जाणारी लोकल आली नव्हती म्हणून सातच्या सुमारास संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला.

वासिंद स्थानकावरील रास्ता रोकोनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी आवाहन करत प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केलं. तब्बल दीड तासांनी ८.२५ च्या सुमारास पहिली लोकल वासिंदहून मुंबईसाठी रवाना झाली.

मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे ४० ते ५० मिनिटे आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. विरार ते बोरीवलीदरम्यान धुक्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत, अशी उद्घोषणा रेल्वे स्थानकांत सुरू होती.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: