Mumbai

मुंबईकरांचा आता एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत आजपासून .

मागच्या एक-दोन वर्षांपासून चर्चा असलेल्या एसी लोकल सेवेचा आज अखेर शुभांरभ झाला आहे.

local train ac

मुंबई : मुंबईकर प्रवासी गेल्या वर्ष भरापासून आतुरतेने वाट पाहत असलेली ए सी लोकल 25 डिसेंबर पासून पश्चिम रेल्वे वरील प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहे.

पहिली एसी लोकल बोरीवली स्टेशनहून चर्चगेटसाठी धावली आहे. 25 ते 29 डिसेंबरदरम्यान एसी लोकलच्या फेऱ्या प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहेत. तर 1 जानेवारीपासून 12 फेऱ्या दररोज चालवल्या जातील. यातील 8 फेऱ्या फास्ट, 3 सेमी फास्ट तर 1 फेरी स्लो असणार आहे. तर देखभालीच्या कामासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असेल.

भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचं पहिल्या सहा महिन्यांसाठी किमान तिकीट 65 रुपये असून, कमाल भाडं 205 रुपये राहणार आहे. मात्र सहा महिन्यानंतर तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. चढ्या दराबद्दल मुंबईकरांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.याच जीएसटीचाही समावेश असेल. तसंच या लोकलसाठी आठवड्याचा आणि मासिक पासही उपलब्ध असेल.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: