Movie

भाडे न दिल्याने मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला घरमालकाने हाकलले .

मल्लिका आणि तिचा बॉयफ्रेंड सिरिल ऑग्जनफैन्सला घर मालकाने पॅरीस स्थित अपार्टमेंटमधून बाहेर काढले.

mallika-sherawat

पॅरीस : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या खाजगी आयुष्यात अडचणी सुरू झाल्या आहेत. तिला आणि तिच्या फ्रेंच बॉयफ्रेंडला पॅरीसच्या एका अपार्टमेंटमधून हाकलण्यात आले.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मल्लिका आणि तिचा बॉयफ्रेंड सिरिल ऑग्जनफैन्सला घर मालकाने पॅरीस स्थित अपार्टमेंटमधून बाहेर काढले.

दोघांनी ८० हजार युरो म्हणजेच साधारण ६४ लाख रूपये भाडे देणे अपेक्षित होते. या दोघांकडे पैशांची अडचण असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मास्क लावलेल्या तीन तरुणांनी मल्लिकाला मारहाण केली होती तसेच अश्रूधूरही सोडत लूट केली होती. पॅरिसमधील तिच्या अपार्टमेंटजवळ ही घटना घडली होती.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: