National

कुलभूषण जाधव पत्नी आणि आईला भेटीदरम्यान अपमान- सुषमा स्वराज

कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानात दिलेल्या अपमानास्पद वागणुकीप्रकरणी सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन केल.

Sushma Swaraj

कुलभूषण आणि त्यांच्या आई, पत्नीच्या भेटीदरम्यान दोघींना पाकिस्तानतर्फे अपमानास्पद वागणूक दिल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत सांगितले. भेटीसाठी दोघांचे सौभाग्यलंकार काढायला लावले. मानवाधिकारांचे उल्लंघन यावेळी झाले तसेच जाधवांच्या आईला सलवार कमीझ घालायला लावल्याचेही यावेळी सांगितले. सुषमा यांनी सांगितले.  राज्यसभेतील निवेदनाद्वारे पाकच्या या भूमिकेचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय सदस्यांनी याला पाठींबा दिला.

कुलभूषण यांची आई अवंती जेव्हा त्यांच्यासमोर गेली तेव्हा तिच्या गळयात मंगळसूत्र आणि डोक्यावर टिकली नव्हती. त्यामुळे आपल्या वडिलांचे काय झाले अशी शंका कुलभूषण यांच्या मनात आली व त्यांनी  बाबा कसे आहेत ? असा पहिला प्रश्न आईला विचारला. मराठी ही जाधव कुटुंबाची मातृभाषा आहे. मातृभाषेत संवाद साधणे केव्हाही सोपे पडते. त्यामुळे कुलभूषण यांच्या आईने त्यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पाकिस्तानने त्यांचा इंटरकॉम फोन बंद केला.

पाकच्या माध्यमांना दोघींना अपमानास्पद वागणूक दिल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले.  पाकिस्तानी मीडियाने दोघींवर खोटे आरोप केल्याचेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानने या भेटीदरम्याने मानवाधिकार तसेच नियम अटींचे उल्लंघन केले आहे. कुलभूषण यांच्या आईला मराठीत बोलण्यास मनाई करण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: