TechnologyTechnologyNational

2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल

महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका महत्त्वाकांक्षी मोहितीमेची तयारी केली आहे

नवी दिल्ली –  महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका महत्त्वाकांक्षी मोहितीमेची तयारी केली आहे.  इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 2 योजनेच्या अखेरच्या टप्प्यात आहे. 2018 मध्ये हे चांद्रयान चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धावरील जागा या मिशनसाठी निवडण्यात आली आहे.

तामिळनाडूतील महेंद्र गिरी येथील इस्रोच्या लिक्वीड प्रॉपल्शन सिस्टिम सेंटरवर सध्या या चांद्रमोहिम -2 च्या ‘टच डाऊन’ ची तयारी सुरू आहे. 70 ते 80 मीटर उंचीवरून चंद्रावर उतरताना किती वेग असावा याचा प्रोटोटाइपवर सराव करण्यात येत आहे.

चांद्रयान -2  उतरवण्यासाठी दोन जागांचा विचार करण्यात आला. यापैकी एक जागा मोहिमेसाठी निवडण्यात येणार आहे. या भागात अन्य कोणतीही चांद्रमोहिम झालेली नाही, अशी माहिती इस्रोचे माजी प्रमुख ए. एस. किरण कुमार यांनी दिली. कुमार मागील महिन्यात इस्रोतून निवृत्त झाले.

सौजन्य : लोकमत

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: