International

पाकमध्ये एका घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान जिंदाबाद’.

पाकिस्तानात घराच्या भिंतीवर 'हिंदुस्तान जिंदाबाद' लिहिणा-या तरुणाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबर-पख्तूनख्वा प्रांतात ही घटना घडली आहे.

 

India Flag  on grunge wall

 

घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ असे लिहिणाऱ्या २० वर्षांच्या पाकिस्तानी तरुणाला अटक करण्यात आली आहे. साजिद शाह असे त्याचे नाव आहे. हरिपूर परिसरातील माखन कॉलनीतील घरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

माखन कॉलनीतील एका घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ असे घोषवाक्य लिहिले होते. याबाबत काही स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानुसार पोलीस रविवारी कॉलनीत पोहोचले. घरातील लोकांना त्यांनी विचारणा केली. त्यांनी साजिदचे नाव सांगितले. पोलिसांनी तात्काळ साजिदला अटक केली आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा सिद्ध झाल्यास साजिदला सात वर्षे तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते, असे वृत्त पाकिस्तानातील ‘द डॉन’ने दिले आहे.

साजिदला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. साजिद एका कारखान्यात काम करतो. त्याला भारतीय चित्रपट आणि संगीत आवडते. त्यामुळे तो भारताचे नेहमीच गुनगान गात असतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: