National

राजस्‍थानमध्ये मिनी बस नदीत कोसळली , ३२ ठार .

राजस्थानमधील माधोपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक प्रवाशांची बस नदीमध्ये पडल्याने अनेक प्रवशांचा मृत्यू झाला आहे.

bus_new_

राजस्थानमधील सवाई माधोपूरजवळ आज सकाळी खासगी बस नदीत कोसळली. या अपघातात ३२ प्रवासी ठार, तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सात वाजता सवाई माधोपूरहून लालसोटकडे निघालेली खासगी बस बनास नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तोडून पात्रात कोसळली. या अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये ४५ हून अधिक प्रवासी होते. ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. जयपूरहून बचाव पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: