National

एक जानेवारीला मुलगी जन्माला आल्यास पाच लाख मिळणार .

कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात एक जानेवारी रोजी जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत.

beautiful-baby-gir

बंगळुरू: :१ जानेवारीला जन्माला येणारी मुलगी ‘लक्ष्मी’च्या पावलानं घरी येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत.

नववर्षाच्या 1 तारखेला बंगळुरू महापालिकेच्या रुग्णालयांत मुलगी जन्माला आल्यास तिच्या भविष्यासाठी प्रशासनातर्फे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. महापौर आर. संपत राज यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे पाच लाख रुपये महापालिका आयुक्त आणि मुलीच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: