Technology

जिओची कॅशबॅक ऑफर ३९९ रुपयांच्या रिचार्जवर मिळणार ३३०० रुपये सरप्राईज .

जिओने नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी खास ऑफर दिली आहे.

Reliance-Jio-Cashback

गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओने नवनवीन ऑफर्सचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी १९९ आणि २९९ रुपयांच्या ऑफर बाजारपेठेत आणल्या होत्या. आता ३९९ रुपयांच्या ऑफरवर ३,३०० रुपयांचा सरप्राईज कॅशबॅक देवून मोबाईलधारकांना सुखद धक्का दिला आहे.

ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा एकाहून एक उत्तम ऑफर्स देत जिओने ग्राहकांची पसंती मिळवलीच पण त्यानंतर आकर्षक कॅशबॅक ऑफर्स देत जिओने त्यांना अधिकच खूश केले आहे. जिओने नुकतीच आपली आणखी एक ऑफर जाहीर केली असून ३९९ रुपयाचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ३३०० रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जिओची सेवा वापरत असाल तर ही संधी अजिबात दवडू नका.

यामध्ये ४०० रुपयांचे माय जिओ कॅशबॅक व्हाऊचर्स मिळतील. ३०० रुपयांचे तत्काळ कॅशबॅक व्हाऊचर्स वॉलेटमध्ये जमा होतील. तर २६०० रुपयांपर्यंतचे ई-कॉमर्स साईटसचे डिस्काऊंट व्हाऊचर्स मिळणार आहेत. याआधी कंपनीने ३९९ आणि त्याहून अधिक रुपयांच्या रिचार्जवर जवळपास २५९९ रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर जाहीर केली होती.

काही दिवसांपूर्वी जिओने आपले १९९ आणि २९९ रुपयांचे आकर्षक प्लॅन लाँच करत ग्राहकांना खूश केले होते. त्यानंतर आता ही कॅशबॅक ऑफर घेऊन आल्याने ग्राहकांना चांगला लाभ मिळणार आहे. १५ जानेवारी नंतर जे लोक पहिल्यांदा रिचार्ज करतील त्यांच्यासाठीच ही ऑफर असेल असे जिओने सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली सेवा वापरावी यासाठी कंपनीने केलेली ही एक अनोखी युक्तीच आहे असे म्हणावे लागेल.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: