National

चारा घोटाळा: मागासवर्गीय असल्याने न्यायाची आशा, आज कोर्टाचा निर्णय .

गेली अनेक वर्षे देशात चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारा घोटाळा प्रकरणी न्यायालात आज (शनिवार) आपला निर्णय देणार आहे.

-laluprasad

 गेली अनेक वर्षे देशात चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारा घोटाळा प्रकरणी न्यायालात आज (शनिवार) आपला निर्णय देणार आहे. या निर्णयावर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

चारा घोटाळाप्रकरणी सीबीआयचे विशेष कोर्ट फैसला सुनावणार आहे. टूजी घोटाळ्याप्रकरणी आलेल्या कोर्टाच्या निर्णयानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनाही या घोटाळ्यातून सुटण्याची शक्यता आहे. भाजपनेच आपल्याला या घोटाळ्यात गोवल्याचा आरोप लालूंनी यापूर्वीच केला आहे. असं असलं तरी न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असून घोटाळ्यातून सुटका होईल असं लालूंनी म्हटलंय. मात्र या प्रकरणी कोर्टात लालू दोषी ठरल्यास लालूंची रवाणगी थेट कारागृहात होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बिहारच्या राजकीय आणि सामाजीक घडामोडींवर आजच्या निर्णायमुळे मोठा प्रभाव पडणार आहे.

1996च्या दरम्यान, बिहारमधील चारा घोटाळ्याने देश हादरून गेला. लालू प्रसाद यादव हे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक आहेत. या घोटाळ्यामुळे लालू अनेकदा तुरूंगातही जाऊन आले आहेत. तसेच, त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: