Pune

भीषण अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर,तीन ठार, तीन गंभीर जखमी.

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची घटना घडली आहे.

accident

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दोन भरधाव गाड्यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर खालापूरजवळ हा अपघात असून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या अपघाताबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, इनोव्हा आणि रिट्झ गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या इनोव्हा गाडीचा मागचा टायर फुटला आणि गाडीचा वेग आवरण्याच्या प्रयत्नात ही गाडी समोरच्या लेनमधून जाणाऱ्या रिट्झ गाडीला आदळली. दोन्ही गाड्या भरदाव वेगात एकमेकांना धडकल्याने त्यातली एक गाडी उलटली. या दुर्घटनेत तीन प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.सध्या महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: