ElectionPoliticalNational

राहुल गांधींच्या नातेवाइकानेच केला आरोप

काँग्रेस अध्यक्षपदाची निवड 'इलेक्शन नाही तर सिलेक्शन', काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे केवळ दिखावा असल्याचे म्हणत पुनावाला यांनी घराणेशाहीवरुन राहुल यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ”ही निवडणूक प्रक्रिया बनावट आहे. मला असं वाटतं की एका कुटुंबात एकच तिकीट मिळालं पाहिजे, मग शहझाद पुनावाला असो किंवा राहुल गांधी”,असे पुनावाला यांनी म्हटले आहे.
पुनावाला म्हणाले अध्यक्षपद राहुल गांधींना मिळावे यासाठी हेराफेरी केली जात आहे. या निवडणुकीत मते टाकणाऱ्या उमेदवारांची नावे फिक्स आहेत. यात गैरप्रकार होत आहे.
पूनावाला यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले, यह सिलेक्शन है, इलेक्शन नही.
-ते गांधी कुटुंबातील असल्याने तेच अध्यक्ष बनतील असेही पुनावाला यांनी म्हटले आहे.
शहजाद पुनावाला यांचे भाऊ तहसीन पुनावाला यांनी एक ट्वीट करत भावाशी संबंध तोडत असल्याचे म्हटले आहे. या प्रकाराने मला मोठे दुःख झाले आहे. आपल्याला भाजपचा पराभूत करायचे आहे. पण हे फारच वाईट असल्याचे म्हणत त्यांनी ट्वीटरवरच संबंध तोडल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे तहसीन पुनावाला हे राहुल गांधींचे मेहुणे असलेल्या रॉबर्ट वढेरा यांचे मेहुणे आहेत.
यासोबतच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याआधी राहुल गांधींनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ‘राहुल गांधींना त्यांच्या उपाध्यक्षपदाचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो. राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदावर नेमणूक झाली आहे. त्यासाठीही त्यांनी निवडणूक लढवलेली नाही. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. मग मीदेखील माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि निवडणूक लढवेन,’ असेही पुनावाला यांनी म्हटले.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: