Mumbai

वाहनं टोलनाक्यावरील पिवळ्या रेषेच्या बाहेर असल्यानंतर टोल आकारु नये.

मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते आहे. त्यातच टोलनाक्यावर अनेक वाहनं अडकून पडली आहेत.

long-queues-of-vehicles-at-mumbai-toll-

‘टोलनाक्यावर टोल भरणाऱ्या वाहनांची रांग तेथील पिवळ्या रेषेच्या बाहेर गेल्यास टोल न आकारताच वाहनं सोडली जायला हवीत. तसं न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

टोल वसुलीमुळं विविध महामार्गांवर वाहतुकीची रोजच्या रोज कोंडी होते. त्यामुळं वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणावर वाया जाते. या विषयच्या सततच्या तक्रारीनंतर त्यावर उपाय म्हणून टोलनाक्यांवर पिवळ्या रेषेचा नियम करण्यात आला. त्यानुसार, टोलनाक्यापासून १० वाहने उभी राहतील इतक्या अंतरावर एक पिवळी रेषा आखण्यात आली आहे. या रेषेच्या पल्याड वाहनांची रांग लागल्यास टोल वसुली न करता वाहनं सोडायची असा नियम आहे. मात्र, अनेक टोलनाक्यांवर हा नियम पाळला जात नाही.

पिवळ्या रेषेच्या नियमाबाबतचा सरकारचा जीआर आम्हाला मिळाला नसल्याचं सांगत ऐरोली टोलनाक्यावरही आज नियमबाह्य पद्धतीनं वसुली केली जात होती. त्यामुळंच मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथं आंदोलन करून टोलवसुली बंद पाडली. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील आदेश दिले आहेत. टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील. या साऱ्यातून मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली आहे. नियमांचे पालन न करता टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई करू. काही दिवसांतच तुम्हाला टोल नाक्यावरील चित्र पालटलेले दिसेल,’ असं शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: