Entertainment

साखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा

5 जानेवारी रोजी दीपिकाचा वाढदिवस असून ती वयाची 32 वर्षे पूर्ण करणार आहे.

ranveer-deepika

5 जानेवारी रोजी साखरपुडा करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे दीपिकाने साखरपुड्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला आहे. 5 जानेवारी रोजी दीपिकाचा वाढदिवस असून ती वयाची 32 वर्षे पूर्ण करणार आहे.दीपिका आणि रणवीर न्यू इयर सेलिब्रेशनसाठी श्रीलंकेत आहेत. 5 जानेवारीला दीपिका तिचा 32 वा वाढदिवसही श्रीलंकेतच साजरा करणार आहे. यानिमित्ताने रणवीर-दीपिका आपल्या नात्याला नवं नाव देण्याची शक्यता आहे.बॉलिवूडमधील राम-लीला म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण लवकरच विवाहसोहळा थाटणार असल्याची तुफान चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर व दीपिकानं श्रीलंकेमध्ये वाढदिवसा साजरा करण्याची योजना आखली आहे. रणवीर श्रीलंकेमध्ये एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी गेला होता. तर रणवीरसोबत न्यू इअर साजरा करण्यासाठी दीपिका तेथे पोहोचली होती. यादरम्यान, त्यांच्या साखरपुड्याचीही माहिती समोर येत आहे.

दरम्यान, दीपिका तसंच रणवीर दोघांकडूनही अद्यापपर्यंत साखरपुड्यासंदर्भातील वृत्तांना  दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र दीपिकाच्या वाढदिवशीच तिचा रणवीरसोबत साखरपुडा होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

दीपिका-रणवीरनं कधीही आपल्या नातेसंबंधांबाबत उघडपणे चर्चा केलेली नाही, मात्र काही दिवसांपूर्वीच रणवीर बॉयफ्रेंड असल्याचं दीपिकानं कबुल केले होतं. शिवाय, नुकतंच रणवीरनं दीपिकाच्या पालकांचीही भेट घेतली होती. दीपिका व रणवीरनं ‘रामलीला’, ‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमांमध्ये काम केले आहे. तर पद्मावती या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित सिनेमांमध्येही हे दोघं दिसणार आहेत. मात्र वादविवादांमुळे हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकण्यास विलंब होत आहेत. या सिनेमामध्ये रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे तर दीपिका पादुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: