MaharashtraMumbai

ओखी चक्री वादळाचा फटका , रायगड बोटी किनाऱ्यावर परतल्या सुरक्षित .

sea

रायगड जिल्ह्यातील रविवारी समुद्रात असलेल्या 29 बोटींपैकी 21 बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत. उर्वरीत 8 बोटी दुपारच्या सुमारास परत येतील, अशी माहिती समोर आली आहे. एकूण 250 बोटीपैकी सोमवारी सकाळपर्यंत 242 बोटी किनाऱ्यावर सुरक्षित परत आल्या आहेत. ओखी चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आता दूर झाली आहे.

जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून समुद्र शांत आहे. प्रवासी बोटी, मासेमारी बोटी, वॉटर स्पोर्ट्स अक्टिव्हिटी बंद करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. सागर किनारी  सागरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या तरी परिस्थिती सामान्य असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

हवामान तज्ञांचा इशारा 

६ डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सागरी किनारी समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी मासेमारांनी सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ञांनी दिलाय.

पावसाची स्थिती 

मुंबईसह सागरी किनाऱ्यांवर ४ तारखेला अंशत: तसेच ५ तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते. ५ तारखेला मुंबई, कोकणात सागरी भागात वाऱ्याची तीव्रता अधिक असेल.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: