Health

केसगळती रोखा ‘ 7’ घरगुती उपाय नक्की करुन पहा .

स्त्रीचे खरं सौंदर्य तीच्या केसांमध्ये असते , मग केसगळती रोखा या काही घरगुती उपायांनी !

bcover1

अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा

१) कांद्याचा रस

कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.

  • कसे कराल ?

– एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा
– रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा
– सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या
– आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा

२) लसुण

कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही ‘सल्फर’चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते .

  • कसे कराल ?

– लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या
– त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या
– मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा
– ३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका
– असे आठवड्यातून दोनदा करा.

३) नारळ

केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.

  • कसे कराल ?

– नाराळाचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा
– तासाभराने केस धुऊन टाका
– किंवा खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा
– रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.

४) हीना

केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत ‘ हीना ‘ प्रामुख्याने वापरला जातो मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.

  • कसे कराल ?

– २५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने घाला.
– हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या.
– आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा
– सुकी हिना पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊ न टाका

अन्य  घरगुती हीना पॅक्स बनवण्यासाठी – (‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय) नक्की पहा.

५) जास्वंद

जास्वंद केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.

  • कसे कराल ?

– काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा.
– हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा
– थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .

केसगळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरीचदेखील बनवू शकता हे  जास्वंदाचे हेअर पॅक्स

६) आवळा

केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी ‘आवळा’ नक्कीच फायदेशीर ठरतो , त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते.

  • कसे कराल ?

– आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा
– हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या
– केस कोमट पाण्याने धुऊन टाका

७) अंड

अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.

  • कसे कराल ?

– एका अंड्यातील पांढरा भाग एक टीस्पून ऑलिव तेलात मिक्स करा हे मिश्रण फेटून केसांना लावून ठेवा.
– १५ ते २० मिनिटांनंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: