National

SBI मध्ये 31 डिसेंबरनंतर चेकबुक चालणार नाहीत .

यंदाच्या एप्रिल महिन्यातच या बँका एसबीआयमध्ये विलीन झाल्या होत्या. याशिवाय भारतीय महिला बँकेचंही एसबीआयमध्ये विलिनीकरण झालं होतं.

sbi

नव्या वर्षात भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी काही नवे नियम लागू होणार आहेत. त्यातील एक प्रमुख बदल म्हणजे, स्टेट बँकेत विलीन झालेल्या बँकांचे चेकबुक आणि आयएफएससी कोड ३१ डिसेंबरनंतर ग्राह्य नसेल.

येत्या १ जानेवारीपासून स्टेट बँकेच्या संलग्न बँकांचे धनादेश स्वीकारले जाणार नाहीत, असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ रायपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि भारतीय महिला बँक या बँकांच्या खातेदारांनी नव्या चेकबुकसाठी अर्ज करावेत, असं आवाहनही त्यांनी केलंय.

स्टेट बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा एटीएममध्ये जाऊन खातेदार नव्या चेकबुकसाठी अर्ज भरू शकतात किंवा स्टेट बँकेच्या अॅपवरूनही त्यांना नवं चेकबुक मिळवता येईल. एसबीआयने मोठ्या शहरांमधील काही शाखांची नावं, ब्रँच कोड आणि आयएफएससी कोडही बदललेत. त्यामुळे खातेदारांनी नव्या वर्षात आपल्या खात्याची संपूर्ण माहिती तपासून पाहावी, असं बँकेनं म्हटलंय.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: