Mumbai

मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वे गाड्या उशिराने .

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या २५ ते ३० मिनिटांने उशिरा धावत आहेत.

mumabi-local-train

मुंबई:
हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे दररोजच हाल होत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मानखुर्दजवळ आज सकाळी रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत.

दुरुस्तीची कामे आणि वेगमर्यादेमुळे हार्बर मार्गावरील लोकल नेहमीच उशिरा धावतात. त्यात गेल्या काही दिवसांपासून रखडपट्टीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात दाट धुके आणि आता सलग दुसऱ्या दिवशी रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. ऐन गर्दीच्या वेळी काल चेंबूरजवळ रुळाला तडा गेला होता. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. रखडपट्टीमुळे वैतागलेले प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत होते. हा संताप कमी होत नाही तोच आजही मानखुर्दजवळ रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल उशिराने धावत आहेत. ऑफिसला पोहोचायला उशीर होत असल्याने आजही ‘लेटमार्क’ लागेल, असे म्हणत नोकरदारांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: