National

एअर इंडियात 49% FDI ला केंद्र सरकारची मंजूरी

air-india

परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आज थेट परदेशी गुंतवणूकीच्या (एफडीआय) नियमांत बदल करण्यास मंजुरी दिली आहे. ऑटोमॅटिक रूटच्या अंतर्गत बांधकाम क्षेत्रात १०० टक्के आणि एअर इंडियात ४९ टक्के भांडवलाची गुंतवणूक करण्यासही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर परदेशी गुंतवणूक होऊन भारतीय अर्थव्यवस्था बळकट होणार असल्याचं सांगण्यात येतं.

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इज ऑफ डूईंग व्यवसायाला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने परदेशी गुंतवणुकीसाठी हात सैल सोडला आहे. ऑटोमॅटिक रूटच्या अंतर्गत बांधकाम क्षेत्रात १०० टक्के गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी या क्षेत्रात केवळ ४९ टक्केच गुंतवणूक करता येत होती. तसेच एअर इंडियातही ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र एअर इंडियातील सर्वाधिक हिस्सा भारतीयांच्याच ताब्यात असणार आहे.

२०१४ मध्ये सिंगल ब्रँड रिटेलमध्ये १०० टक्के गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली होती. आता अॅटोमॅटीक रूटला मंजुरी मिळाल्यामुळे अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणुकीस उत्सुक होतील. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फायदाच होईल. शिवाय नोकऱ्याही निर्माण होतील. दरम्यान, मल्टी ब्रँड रिटेलबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. कारण त्याला आधीच राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनांनी विरोध केलेला आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: