Life StyleEducation

जात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही! – सर्वोच्च न्यायालय

महिलेने आंतरजातीय विवाह केला, तर लग्नानंतर तिची जात बदलते आणि पती ज्या जातीचा आहे, तीही त्याच जातीची होते, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तो चुकीचा आहे. कारण, लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही, असं थेट सर्वोच्च न्यायालयानेच सूचित केलं आहे. Supreme Court Caste certificate सर्वोच्च न्यायालयजात  प्रमाणपत्रतुम्ही ज्या जातीत जन्माला येता, शेवटपर्यंत त्याच जातीचे राहता, असं स्पष्ट मत खंडपीठाने मांडलं आहे.
जन्माने जी जात तुम्हाला मिळाली आहे, ती अपरिवर्तनीय आहे. लग्नानंतरही त्यात बदल होत नाही, असं खंडपीठाने नमूद केलं. सदर महिला ही अग्रवाल कुटुंबात जन्मली असून ही जात सर्वसाधारण प्रवर्गात मोडते. मात्र, तिचा पती हा मागासवर्गीय समाजातील असल्याने तिला लग्नानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कसे काय मिळू शकते?, असा प्रश्न करत खंडपीठाने तिची याचिका फेटाळली.
बुलंदशहरमधील एक महिला 21 वर्षांपूर्वी मागासवर्गीय कोट्यातून केंद्रीय विद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. परंतु, तिचा जन्म अग्रवाल कुटुंबात – अर्थात सर्वसाधारण प्रवर्गात झाल्याचं लक्षात घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची नियुक्ती रद्दबातल ठरवली होती. या निर्णयाला तिनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. आपला पती मागासवर्गीय समाजातील असल्यानं लग्नानंतर आपणही त्याच जातीच्या झालो आहोत, असं तिचं म्हणणं होतं. परंतु, न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम एम शंतनागौदर यांच्या खंडपीठाने तिचा हा दावा खोडून काढला.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: