National

बिहारमध्ये साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट , 4 मजुरांचा मृत्यू .

बिहारमधील गोपाळगंज येथील एका साखर कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे.

Bihar-sugar-mill-explosion-

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका साखरेच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झालाय.

दुर्घटना घडली तेव्हा साखर कारखान्यात १००हून अधिक कामगार होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळगंज येथे सासामूसा साखर कारखाना आहे. बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोट झाला आणि एकच कल्लोळ झाला. हा स्फोट बॉयलर फुटल्याने झाला. यावेळी चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर १२हून अधिक कामगारांची प्रकृती गंभीर आहे.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर झालेले कामगार ९० टक्क्यांहून अधिक भाजले गेलेत. स्थानिक प्रशासनाकडून साखर कारखाना रिकामा करुन तपास सुरु केलाय. कारखान्यात काम करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयलरच्या तपासणीशिवायच तो चालू करण्यात आल्याने ही दुर्घटना घडली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: