NationalUncategorized

बिहार मसूदन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण, रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांचा हल्ला.

रेल्वे कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्याबरोबर त्यांनी सिग्नलिंग पॅनेलला आग लावली.

naxals-bihar

बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. येथील मसूदन रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी हल्ला करून रेल्वेस्थानकाला आग लावली. त्यानंतर या नक्षलवाद्यांनी रेल्वेचे सहाय्यक स्टेशन मास्तर आणि एका रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण करून पळून गेले. या घटनेमुळे संपूर्ण बिहार हादरून गेलं असून नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.

मंगळवारी रात्री ११.३० वाजता नक्षलवाद्यांनी मसूदन रेल्वे स्टेशनवर हल्ला चढविला. दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण करतानाच रेल्वेच्या सिग्नलिंग पॅनेलसह रेल्वेच्या इतर मालमत्तांना आग लावली. दरम्यान, नक्षलवाद्यांचा हल्ला होताच सहाय्यक स्टेशन मास्तरने त्यांच्या अपहरणापूर्वी मालदा डिआरएमला फोन करून या हल्ल्याची माहिती दिली होती.’ मसूदन रेल्वेस्थानकावर ट्रेन आल्यातर नक्षलवादी प्रवाशांना ठार करतील,’ असं या स्टेशन मास्तरनं डिआरएमला कळवलं होतं. त्यानंतर लगेचच रेल्वेस्थानकावर अनाऊन्समेंट होऊन या हल्ल्याची प्रवाशांना सूचना देतानाच त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं.

नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यानंतर मसूदन रेल्वेस्थानकाकडे येणारी रेल्वेसेवा बाधित झाली होती. त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास झाला. काही तासानंतर सिग्नलिंग पॅनेल दुरुस्त केल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली. दरम्यान, मसूदनमध्ये नक्षलवाद्यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून कोणतीही कारवाई होण्याची शक्यता गृहित धरून पोलीस आणि सुरक्षा दलाला अॅलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: