BusinessMumbaiNational

तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा

पंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे.

पंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे.
या अफरातफरीचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. या प्रकरणात थेट कोणाचे नाव अद्याप पुढे आले नाही. पण, चौकशी अंती सत्य बाहेर येईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हे प्रकरण बाहेर येताच पीएनबीचा शअर्स ८ टक्क्यांनी घसरला आहे. ज्यात गुंतवणूकादारांचे ३००० कोटी रूपये बुडाले आहेत. बुधवारी सुरूवातीला व्यवहार सुरू झाला तेव्हा पीएनबीचा शेअर ५.७ टक्क्यांनी घसरला.
पीएनबीने जलर आणि इतरांवर ४.४ कोटी डॉलर्सचा अफहार केल्या प्रकरणी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणाने आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, यंत्रणा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, अपहार झालेल्या रकमेपैकी निवडक रक्कम ही ज्या खात्यातून अपहार केला जायचा त्या खातेदारास आदा केली जायची. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बॅंक प्रशासनाने बॉम्बे स्टॉक एस्चेंज विभागाला (BSE) माहिती दिली आहे. या अफरातफरीचा परिणाम इतर बॅंकावरही पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बॅंकेची अंतर्गत यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: