Pune

राज्‍यातील 12 जिल्‍हाधिका-यांना अटक करा , आदेश राष्ट्रीय हरित लवादचे .

राष्ट्रीय हरित लवादने निष्काळजीपणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांबाबत नाराजीही व्यक्त केली.

ngt-zee

पुणे : फ्लोराईडचं मिश्रण असलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे आदेश देण्यात आले होते, त्या आदेशांचं पालन न करणाऱ्या राज्यातील तब्बल 12 जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादने दिले आहेत. त्यासंदर्भात जामीनपात्र वॉरंट संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आले आहे.त्‍यावेळी फ्लोरोसिस आजारवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी योग्‍य त्‍या उपाययोजना कराव्‍यात, असा आदेश लवादाने राज्‍यातील जिल्‍हाधिका-यांना दिला होता. मात्र 3 वर्षांनंतरही आदेशाचे पालन न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या अटकेचे आदेश देण्‍यात आले आहेत. लवादाने तसे जामीनपात्र वॉरंट संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवले आहे.

यामध्ये नांदेड, चंद्रपूर, बीड, यवतमाळ, लातूर, वाशीम, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, नागपूर व भंडारा येथील जिल्हाधिका-यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत बोअरवेलचे प्रमाण अधिक आहे. येथे दोन बोअरवेलमधील अंतर, खोली याबाबतचे नियमांचे पालन होत नाही. याविरोधात असिम सरोदे यांनी याचिका दाखल केली होती.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: