National

मागण्या मान्य न झाल्यास अण्णा हजारे प्राणाची आहुती .

भारतीय शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना अण्णांनी हा इशारा दिला.

Anna-Hazare-

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या मार्चमध्ये दिल्लीत आंदोलन करणार आहेत. ‘हे आपलं शेवटचं आंदोलन असेल. या आंदोलनातील मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर प्राणाची आहुती देईन,’ असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.

यावेळी भारतीय किसान युनियनच्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला. ‘सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं म्हणून आंदोलन करण्यात येईल. पण सरकारनं आमचं ऐकलं नाही तर मी जागेवरच प्राण सोडेन, असं त्यांनी सांगितलं.

येत्या २३ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आव्हान करतानाच तुरुंगात जाण्याची तयारी असेल तर दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा, अशी हाकही त्यांनी दिली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष उलटली तरी परिस्थिती जैसे थेच आहे. गोऱ्यांनी देश सोडल्यानंतर आता काळ्या लोकांनी राज्य सुरू केलं आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

 

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: