६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

बलात्काराच्या घटनेनं दिल्ली हादरली आहे. एका १५ वर्षांच्या मुलानं घरकाम करणाऱ्या ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी कामावरून परतताना दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म्सजवळ मुलानं बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेनं केली आहे.

पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. त्याला बालसुधारगृहात पाठवलं आहे.या मुलाचे वडील एके ठिकाणी केअरटेकर म्हणून काम करतात. तसेच जिथे ही घटना घडली त्या मोकळ्या जागेच्या शेजारच्या भागातच हा मुलगा राहतो असेही पीडितेने सांगितले. तर पीडित महिला इतरांच्या घरी घरकाम करून तिचा उदरनिर्वाह चालवत असल्याचे समजते आहे.

दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म्सजवळ आरोपी थांबला होता. त्याचवेळी मी कामे आटोपून घरी निघाले होते. आजूबाजूला कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याने बळजबरी केली. मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याने चिडून मला मारहाण केली. याबाबत कुणाला सांगू नको, असे धमकावून तेथून पसार झाला, असे पीडितेने नेबसराय पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपीला पकडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांचे पथक नेमले. त्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.
तुमची प्रतिक्रिया नोंदवा
crime