Movie

अमित मसुरकरचा ‘न्यूटन’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर .

न्यूटन सिनेमात राजकुमार राव मुख्य भूमिकेत असून मराठमोळ्या अमित मसुरकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

newton1सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून भारताचं प्रतिनिधित्व करणारा ‘न्यूटन’ हा सिनेमा बाहेर पडला आहे.

सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागातून ‘न्यूटन’ला नामांकन मिळालं होतं. परंतु, त्याला अंतिम फेरीत धडक मारता आली नाही. ‘अ फॅनटॅस्टिक वुमन’, ‘इन द फेड’, ‘ऑन बॉडी अँड सोल’, ‘फॉक्सट्राट’, ‘दी इनसल्ट’ , ‘लवलेस’, ‘द वुंड’, ‘फेलिसिटे’, ‘द स्क्वायर’ या नऊ सिनेमांमध्ये आता ऑस्करसाठी चुरस होणार आहे.

देशातील राजकारणावर उपरोधिक भाष्य करणाऱ्या ‘न्यूटन’ चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा तरुण अमित मसुरकरने केलं आहे. अभिनेता राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झालं होतं.
तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: