Mumbai

मुंबईत वाळकेश्वरमध्ये 31 मजल्याच्या इमारतीला भीषण आग .

fire

मुंबईत वाळकेश्वरमध्ये 31 मजल्याच्या इमारतीला भीषण आग .रिगल टॉवरच्या १७ व्या मजल्याला ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वाळकेश्वरमध्ये रिगल टॉवर ही ३1 मजली इमारत आहे.

ही इमारत 31 मजल्यांची असून 17 आणि 18 व्या मजल्यावरील डुप्लेक्स फ्लॅटला आग लागली आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचेही फ्लॅट या इमारतीत आहेत. सध्या या इमारतीतील अनेक फ्लॅट हे सध्या रिकामेच आहेत. पण काही फ्लॅटमध्ये केअर टेकरही आहेत. त्यामुळे इमारतीत असणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचं कामही सुरु आहे.

सध्या घटनास्थळी 4 फायर इंजिन, 3 जेट टँकर आणि रुग्णवाहिका पोहचल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत मात्र कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: