TechnologyTechnologyNagpurMaharashtra

नागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब

मुंबई : नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी (व्हीआयए) राज्य सरकारने सोमवारी करार केला. या प्रकल्पात सुमारे १८८ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
राज्यात संरक्षण व हवाई क्षेत्राशी संबंधित उद्योग मेक इन इंडिया अंतर्गत उभे करण्यासाठी राज्य सरकारने मागील आठवड्यातच यासंबंधीचे विशेष धोरण तयार केले आहे. नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद व अहमदनगर येथे संरक्षण हब उभे करण्यात येणार आहेत.
नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी व्हीआयएद्वारे संरक्षण उद्योग संघटना (डीआयआयए) कार्यरत होती. या दोघांच्या प्रयत्नातून टाटा टेक्नॉलॉजी हा हब उभा करण्यासाठी समोर आले आहे. सोमवारी झालेल्या सामंजस्य करारात टाटा या प्रकल्पासाठी २० एकरावर १८८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी विदर्भ डिफेन्स हब अ‍ॅण्ड इंडस्ट्रीअल क्लस्टरची स्थापना करण्यात आली आहे.
मिहानमधील या प्रकल्पात टाटा टेक सुविधा केंद्राची उभारणी केली जाईल. त्याअंतर्गत सर्वांत आधी संरक्षण सामग्री उत्पादनासाठी लागणाºया मनुष्यबळाची निर्मिती केली जाईल. त्यानंतर टाटांकडून सुविधांची उभारणी होईल. सुविधा उभारणीनंतर संरक्षण उत्पादन करणाºया कंपन्या या क्लस्टरमध्ये गुंतवणूक करतील, अशी योजना आखण्यात आली आहे.

देशाच्या आयुधांचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे हे या क्लस्टरचे अध्यक्ष आहेत. आॅटो क्षेत्राचा २० वर्षे अनुभव असलेले हर्ष गुणे हे सीईओ आहेत.

तोफखाना विभागातील निवृत्त अधिकारी मेजर जनरल अनिल बाम, डीआयआयएचे दुष्यंत देशपांडे व व्हीआयएचे सचिव सुहास बुधे यांचा यामध्ये सहभाग आहे. व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे यांनीही या करारासाठी विशेष मेहनत घेतली.

सौजन्य : लोकमत

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: