MaharashtraMaharashtraMumbaiPolitical

मनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण?

राज ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

मनसेमराठीत पाट्या लावण्यावरून विक्रोळीत मनसे पदाधिका-यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या ‘कृष्णकुंज’वर आज दुपारी तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक दुपारी 12 च्या सुमारास सुरू झाली आहे. राज ठाकरेंनी आजच्या बैठकीला सर्व विभागातील अध्यक्षांसोबतच महत्त्वाच्या पदाधिका-यांना पाचारण केले आहे. मुंबईतील आगामी काळातील पक्षाची भूमिका, आंदोलनाबाबत काय भूमिका असावी, वाटचाल कशी करावी हे आजच्या बैठकीत ठरणार आहे.
दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर मुंबई काँग्रेसचे प्रमुख संजय निरूपम यांनी मनसेच्या जखमेवर मीठ चोळणारे टि्वट केले आहे. संजय निरूपम यांनी टि्वट करताना, मनसेच्या गुंडांनी पुन्हा एकदा मार खाल्ला. पण आम्ही हिंसेचे समर्थन करत नाही, असे म्हटले.

सौजन्य : दिव्यमराठी न्यूज टीम

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: