MaharashtraMaharashtraUncategorized

बल्लारशाह-गोंदिया दरम्यान विद्युत वाहिनीचा खांब गाडीवर पडला; जिवीतहानी नाही

बल्लारशहा-गोंदिया दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीवर विद्युत वाहिनीचा खांब पडल्याने काही काळ ही गाडी येथे अडकून पडली. या मार्गावर असलेल्या पांढरी ते पिंडकेपार दरम्यान ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली.

गोंदिया- बल्लारशहा-गोंदिया दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीवर विद्युत वाहिनीचा खांब पडल्याने काही काळ ही गाडी येथे अडकून पडली. या मार्गावर असलेल्या पांढरी ते पिंडकेपार दरम्यान ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली.
बल्लारशाह ते गोंदिया या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले असून, या मार्गावरील पॅसेंजरगाडी शनिवारी सकाळी पांढरी-पिंडकेपारच्या दरम्यान असताना अचानक हा खांब गाडीच्या शेवटून दुसऱ्या क्रमांकाच्या बोगीवर पडला. खांब पडल्याने विद्युत प्रवाह खंडित होऊन गाडी जागीच थांबली.
ही घटना मुख्य स्टेशनला कळवण्यात आली. काही अवधीनंतर एक डिझेल इंजिन पाठवण्यात येऊन नंतर ही गाडी हळूहळू मार्गस्थ झाली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: