Life StyleBusinessTravel

फक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास

एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली आहे.

सामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा,  एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली आहे. भारतातील सात मोठ्या शहरांचा सर्वात कमी भाड्यामध्ये आता तुम्हाला प्रवास करता येणार आहे. एअर एशिया या कंपनीनं रविवारी या योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी तुम्हाला 99 रुपये अथवा त्याहून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

एअर एशिया कंपनीनं 99 रुपयांमध्ये तुम्हाला बंगळुरू, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांचीचा प्रवास उपलब्ध करून दिलं आहे. इतकेच नव्हे तर कंपनीनं प्रवाशांसाठी आणखीही काही खास ऑफर आणल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासाचं तिकीट 1499 रुपयांपासून सुरू केलं आहे. या ऑफर अंतर्गत ऑकलंड, बाली, बँकॉक, क्वालालंपूर, मेलबर्न, सिंगापूर आणि सिडनीचा प्रवास करता येणार आहे. आजपासून ऑफर सुरू झाली असून, 31 जानेवारीपर्यंत तिकीट बुकिंग केलं जाऊ शकतं. यासाठी 15 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत ट्रॅव्हल्स पीरियडही देण्यात आला आहे. एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्सचे 51 टक्के भागीदारी आहे. इतर 49 टक्के भागीदारी ही एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ऑफ मलेशिया या कंपनीकडे आहेत.

1299 रुपयांमध्ये करा विमान प्रवास
गेल्या वर्षी एअर एशियाने वर्षअखेरनिमित्त स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत देशांतर्गत विमान प्रवास अवघ्या 1,299 रुपयांत, तर आंतरराष्ट्रीय प्रवास 2,399 रुपयांत करता येणार होता. ही सवलत योजना मर्यादित काळासाठी होती. या योजनेंतर्गत बुकिंग केलेल्यांना 31 मार्च 2018 पर्यंत प्रवास करता येणार आहे.
एअर एशियाच्या नेटवर्कमध्ये बंगळुरू, रांची, हैदराबाद, पुणे, कोलकाता, कोची आणि नवी दिल्ली इत्यादी ठिकाणांसाठी उड्डाण करण्याची सोय त्यात आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावरील किमान तिकिटाची किंमत 2,399 रुपये आहे. क्वालालंपूर, बाली, बँकॉक, कारबी, फुके, मेलबोर्न, सिडनी, सिंगापूर, ऑकलँड या गंतव्य स्थानांचा त्यात समावेश आहे. एशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पूर्व आशिया आणि अमेरिका या देशांतील 20 गंतव्य स्थानांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: