NagpurMaharashtra

नागपूर-अमरावती हायवेवर अॅम्ब्युलन्सवर धडकला.

ज्या रुग्णालयात मुलाला उपचारासाठी नेले जात होते, त्याच रुग्णालयात आता त्या मुलाचे शवविच्छेदन होणार.

nagpur01

नागपूर – अमरावती महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका ट्रकने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार ठार, तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

एका आजारी मुलाला रुग्णवाहिकेतून ​मेयो हॉस्पिटलमध्ये आणले जात होते. या रुग्णवाहिकेला पहाटे साडेतीनच्या सुमारास कोंढाळीजवळ विरुद्ध दिशेकडून भरधाव येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील चार जण जागीच ठार झाले. तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुलगा, आई आणि इतर दोघांचा समावेश आहे. तर मुलाचे वडील जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चुकीच्या दिशेने येणारा ट्रक अॅम्ब्युलन्सवर धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: