राष्ट्रीय

देशभरातील डॉक्टर आज संपावर . आरोग्यसेवा १२ तास बंद आहे.

देशभरातील डॉक्टरांचा हा बंद असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

doctor-gp-

देशभरातील डॉक्टरांचा हा बंद असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. सोबतच मुंबई आणि ठाण्यातील डॉक्टरांनी ‘ब्लॅक डे’ पाळला आहे. ठाणे जिल्ह्यातील सुमारे 600 पेक्षा जास्त डॉक्टर संपावर जाणार आहेत. मात्र सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपत्कालीन व्यवस्था सुरु राहणार आहे.

या विधेयकाला मागील महिन्यातच केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. तेव्हापासूनच या विधेयकाला विरोध सुरु झाला होता. हे विधेयक ‘रुग्ण विरोधी’ असल्याचा दावा आयएमएनं (इंडियन मेडिकल असोसिएशन) केला आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी हे विधेयक आणलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण या विधेयकानंतर भ्रष्टाचार आणखी वाढेल. असाही दावा त्यांनी केला आहे.

सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापुढेही प्रखर आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा डॉक्टरांनी दिला आहे. नव्या विधेयकामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेचा व सहभागाचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही असा आरोप करीत ज्या समितीमध्ये डॉक्टरांचा सहभाग अधिक हवा त्यात बिगरवैद्यकीय व्यक्तींचा सहभाग वाढवण्यात आलेला आहे, ज्या देशामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक व तज्ज्ञांना त्या क्षेत्राशी संबधित निर्णयप्रक्रियेमध्ये विश्वासाने सामावून घेतले जात नाही, तिथे रुग्णहित कसे जपले जाणार, असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. जयेश लेले यांनी उपस्थित केला आहे.

नव्या विधेयकामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अटी ठेवण्यात आलेल्या नाहीत, त्यासाठी संमती घेण्याचीही गरज नाही. त्यामुळे वैद्यकीय जागा किती वाढवाव्यात यावर या महाविद्यालयांना नियंत्रण ठेवता येणार नाही. गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना पैसे देऊन वैद्यकीय शिक्षण मिळणार असेल तर त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. या जागांवर असलेला सरकारी अंकुश कमी करण्यात आला आहे, त्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील शुल्क किती असावे हेही ठरविण्यासाठी निर्बंध नाहीत. त्यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना या संधीपासून मुकावे लागेल, अशी भीती आयएमएचे डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केली.

 खासगी डॉक्टरांची ओपीडी बंद असल्याने पालिका रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या थोडी वाढते. त्यामुळे त्यादृष्टीने अतिरिक्त डॉक्टरांचा चमू सज्ज ठेवण्यात येणार आहे, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.डॉक्टरांवर लादण्यात आलेले निर्बंध, सुरक्षा, औषधांवरील जीएसटी असे अनेक महत्त्वाचे प्रश्न वैद्यकीय क्षेत्रात असताना केंद्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. इंडियन मेडिकल कौन्सिलने आतापर्यंत कोणतीच भूमिका घेतली नाही, असे वारंवार बिंबवले जात आहे. ही भूमिका घेऊ न देण्यामागेही राजकीय हस्तक्षेप कारणीभूत होते. आताही या विधेयकाचा रोख वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनागोंदी निर्माण करण्याचाच असल्याचा आरोप तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे.
तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: