महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या समुद्रात लाटा उसळणार चक्रीवादळाचा धोका .

मुंबईपासून ४२० किलोमीटर अंतरावर असलेले हे वादळ हळूहळू गुजरातकडे सरकत आहे.

mumbai

मुंबई : ओखी वादळाचा तडाखा आता कोकणच्या किनारपट्टीला बसण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान मुंबई, रायगड परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली पुढचे तीन दिवस मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.शिवाय समुद्रात सुमारे पाच ते साडे पाच मीटरच्या लाटा उसतील.त्यामुळे चक्रीवादळ, पाऊस आणि भरतीची वेळ एकत्र जुळून आल्यास मुंबईकरांच्या त्रासात वाढ होईल.

तामिळनाडू, केरळमध्ये विध्वंस करून आता अरबी समुद्रात आलेले ओखी चक्रीवादळ मुंबईपर्यंत धडकले आहे. शिवाय याची वाटचाल सुरतच्या दिशेने सुरू झाली अाहे. आज (मंगळवार) उधाणाच्या भरतीच्या दुपारी 12 वाजून 43 मिनिटांनी समुद्रात 4.35 मीटर लाटा उसळणार असून ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी न जाण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: