पुणे

नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड .

chandere

मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या बाणेर येथील विरभद्र नगरमधील निवासस्थानी आयकर विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही धाड टाकण्यात आली आहे. साध्या वेषात व खासगी गाड्यातून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकारी व पोलिसांनी ताबडतोब घराचा ताबा घेऊन सुरक्षाव्यवस्थेत तपासणीला सुरूवात केली. जवळपास बारा जणांच्या चमूने ही तपासणी सुरू केल्याचे कळते आहे. सकाळपासून सुरू असलेली तपासणी अजूनही सुरू आहे.

बाबुराव चांदोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक आहेत. ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. बाबुराव चांदोरे आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र, त्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचे अनेक व्यवसाय होते. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी साध्या वेषातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभाग आणि पोलिसांचे पथक अजूनही याठिकाणी उपस्थित असून चांदेरे यांची चौकशी केला जात आहे. मात्र, या कारवाईमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: