मनोरंजनमहाराष्ट्र राष्ट्रीयसिनेमा

श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी

अवघ्या ५४ व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘हवा-हवाई’ची म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांची आयुष्याच्या स्क्रीनवरून एक्झिट लाखो चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांचे शनिवारी दुबईत रात्री ११च्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. ही बातमी कळताच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी श्रीदेवी यांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही श्रीदेवी यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली. तर श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केलेले ट्विट काँग्रेसला चांगलेच महागात पडले आहे.

‘श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्याच जिवंत असतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. २०१३ मध्ये युपीए सरकारच्या काळात त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला होता,’ असे ट्विट काँग्रेसने केले आणि या ट्विटची शेवटचीच ओळ काँग्रेसच्या अंगाशी आली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: