पुणेमहाराष्ट्र

पुण्याजवळ कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात ४ ठार.

पुणे-सातारा रस्त्यावर जांभुळवाडी येथे दरीपुलाजवळ सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

car-accident-pune

पुणे-सातारा मार्गावर जांभुळवाडी येथे कात्रज बोगद्याजवळ आज पहाटे कार आणि ट्रक दरम्यान झालेल्या भीषण अपघातात अख्खं कुटुंब ठार झालं. या अपघातात एकूण चारजण जागीच ठार झाले असून त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबईतील चुनाभट्टी येथील रहिवासी आहेत.

या अपघातात यशवंत पांडुरंग माने (४७), त्यांची पत्नी शारदा माने, मुलगा ऋषीकेश माने (२०) आणि चालक रामचंद्र सुर्वे (७१) जागीच ठार झाले. माने कुंटुंबीय मूळचे मुंबईचे असून ते चुनाभट्टीला राहतात. त्यांची मुलगी शिक्षणासाठी पुण्यात आहे. तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी माने कुटुंबीय रविवारी पुण्याला आले होते. तिला सोडून ते फलटणला निघाले होते. पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी जांभुळवाडी येथे कात्रज बोगद्याजवळच्या दरीपुलाजवळ भरधाव ट्रक आणि त्यांच्या मारुती सुझुकी कारची जोरदार टक्कर झाली. या धडकेत संपुर्ण कारचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे कारमधील चौघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताचं वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: