मुंबई

सचिन तेंडुलकरच्या कन्येला फोन करुन त्रास देणाऱ्या तरुणाला अटक

Sara-Tendulkar

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱ्या विकृताला मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. देव कुमार मैती असे या आरोपीचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईला आणले जाईल.

सारा तेंडुलकरला गेल्या काही दिवसांपासून एक तरुण फोन करुन त्रास देत होता. या प्रकरणी सारा तेंडुलकरच्या वतीने पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता पश्चिम बंगालमधील मिदनापूरमधून देव कुमार मैती या तरुणाने हे फोन केल्याचे उघड झाले. मुंबई पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने देवकुमार मैतीला अटक केली. देवकुमार मैती सारा तेंडुलकरच्या घरी फोन करायचा. सारा तेंडुलकरचे अपहरण करण्याची धमकी देखील तो देत होता. साराशी लग्न लावून देण्यासाठी तो धमकी द्यायचा, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. देवकुमारने साराचा नंबर कसा मिळवला, याचा खुलासा सखोल चौकशीनंतरच होईल, असे पोलिसांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: