राष्ट्रीय

दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला दहशतवाद्यांचा कट उधळला

delhi-police

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी रविवारी एका दहशतवाद्याला अटक केली असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अक्षरधाम मंदिर उडविण्याचा कट रचल्याची कबुली त्याने दिली आहे. दरम्यान, त्याच्या आणखी दोन साथीदाराला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला आणि आयबीला दिली आहे. संशयित दहशतवाद्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या दोन सहकाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

रविवारी निजामुद्दीन भोपाळ रेल्वेतून संशयित दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रेल्वेत त्याच्या संशयास्पद हालचालींची तिकीट तपासनीसास शंका आली आणि त्यांनी रेल्वे पोलिसांना (जीआरपी) याची माहिती दिली. जीआरपीच्या चौकशीत त्याने आपण दहशतवादी असल्याचे सांगितले. जीआरपीने लगेच याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला दिली. चौकशीदरम्यान त्या व्यक्तीने प्रथम वेड्यासारख्या हालचाली केल्या. नंतर त्याने कटाची माहिती दिली. बिलाल अहमद वागय असे त्याचे नाव असून तो काश्मीरमधील अनंतनाग येथील आहे. तो आणि त्याचे इतर दोन काश्मीर सहकारी २६ जानेवारीच्या कार्यक्रमांवर आणि अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्याची तयारी करत होते. त्याचे दोन सहकारी जामा मशिदीजवळील लॉजमध्ये उतरले असल्याचे त्याने सांगितले. त्याच लॉजमध्ये आपण ही राहिल्याचे त्याने सांगितले.

 

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: